टीम मंगळवेढा टाईम्स ।
ट्रॅक्टर चालकाने कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नंदूर येथील शिक्षक श्रीशैल्य गुराप्पा मोसलगी याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून
ऊसाच्या फडात लपून बसलेल्या त्या शिक्षकास शोधून ताब्यात घेवून तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी हरी गौतम आठवले (रा.नंदूर) हे त्याच गावातील कवठे ता. उत्तर सोलापूर येथील आश्रम शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्रीशैल्य गुराप्पा मोसलगी यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून मागील एक वर्षापासून काम करीत आहेत.
दि.6 रोजी सकाळी 6.00 वा. फिर्यादी हे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर लोकमंगल साखर कारखाना भंडारकवठे येथे घेवून गेले.
फिर्यादीच्या मुलीची तब्येत ठिक नसल्याने उपचारासाठी कामाचे पैसे मागण्यासाठी आरोपी श्रीशैल्य मोसलगी यांच्याकडे घरी गेले असता त्यावेळी आरोपी हे दारू पिल्याने त्यांनी
पैसे न देता शिवीगाळ करून कशाला पाहिजेत पैसे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करून हाताने,रस्सीने डोक्यावर डाव्या मांडीवर,खुब्यावर,तोंडावर मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाण करीत असताना तम्माराया बगले यांनी मध्ये पडून तेथून जखमी फिर्यादीची त्यातून सुटका केली. गुन्हा दाखल होताच डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोराळे बीटचे पोलिस नाईक सोमनाथ माने व खंडाप्पा हत्ताळी
या दोघांनी ऊसाच्या फडात लपून बसलेल्या आरोपीचा शोध घेवून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज