टीम मंगळवेढा टाईम्स न्यूज |
तहसीलदारांच्या आदेशानुसार मंजूर झालेला शेतरस्ता खुला करण्यासाठी महसूल विभागाचे पथक धर्मगाव येथे कारवाई करीत असताना मंडल अधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत कोयत्याचा धाक दाखवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी
सहा जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद मंडल अधिकारी धनंजय शिवाजी इंगोले यांनी दिली आहे. ही घटना काल ३० जून २०२६ रोजी धर्मगाव शिवारातील गट क्रमांक ६६ मध्ये घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, मंडल अधिकारी धनंजय इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धर्मगाव येथील शेतकरी सोमनाथ अशोक पाटील व मंगल बसवंत पाटील यांनी त्यांच्या शेतात जाण्यासाठी पूर्वापार वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती.

तहसीलदारांनी त्यानुसार मामलेदार कोर्ट अधिनियम, १९०६ च्या कलम ५ अंतर्गत ३ डिसेंबर २०२५ रोजी आदेश देऊन संबंधित शेतरस्ता मंजूर केला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाने २९ जून रोजी रस्त्याच्या काही भागात मोजमाप व खुणा केल्या होत्या.

मात्र पावसामुळे उर्वरित काम पुढे ढकलण्यात आले होते. नवनाथ श्रीमंत पाटील, लक्ष्मण गोपाळ आळगे, संतोष नवनाथ आळगे, शिवशरण गुरूदप्पा सालगुटी, नागनाथ श्रीमंत पाटील, सिद्धेश्वर संतराम गोडसे (सर्व रा. धर्मगाव) यांनी या ठिकाणी रस्ता करायचा नाही, असे म्हणत मंडल अधिकारी इंगोले यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

या घटनेनंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात सहाही आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ, धमकी देणे व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल करीत आहेत.

काम सुरू असतानाच आरोपी अंगावर धावले
मंगळवारी मंडल अधिकारी धनंजय इंगोले हे धर्मगावचे पोलीस पाटील अविनाश कुचेकर, महसूल कर्मचारी, पोलीस नाईक बाबर व इतर कर्मचाऱ्यांसह मंजूर रस्ता खुला करण्याचे काम करीत असताना आरोपींनी तेथे येऊन कामास विरोध केला
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










