mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गोलमाल! काळेंची शेती फायद्यात अन् कारखाना मात्र तोट्यात; अभिजीत पाटीलांचा थेट मुळावर घाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 8, 2023
in राजकारण, सोलापूर
गोलमाल! काळेंची शेती फायद्यात अन् कारखाना मात्र तोट्यात; अभिजीत पाटीलांचा थेट मुळावर घाव

पंढरपूर । राजेंद्र फुगारे

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे २३कोटी रुपये थकीत बिल आहे. यामधून भंडीशेगाव मधील एका तरुणाचे बत्तीस हजार रुपये देण्यासाठी कारखान्याकडे बिल नाही. ही बाब खेदाची आहे.

ग्रामीण भागातील सर्वसाधारण मजुरीला जाणाऱ्या महिलेकडे जाऊन पाहिलं तरी एवढी रक्कम असू शकते.

चेअरमन काळे यांनी कारखान्यातील कारभारापेक्षा आपल्या शेतीकडे लक्ष दिल्याने शेती फायद्यात आणली आहे अन् कारखाना मात्र तोट्यात असल्याचे भासवत आहेत. असा टोला चेअरमन अभिजीत पाटील यांनी काळे यांना लगावला आहे.

तालुक्यातील पिराची कुरोली येथे बुधवारी सायंकाळी सहकार शिरोमणी विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत अभिजीत पाटील बोलत होते.

यावेळी डॉ बी. पी. रोंगेसर, दीपक पवार अमरजीत पाटील, बाळासाहेब कोलगे यांच्यासह विठ्ठलचे संचालक उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, चालू हंगामातील गाळप मधून 120 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु शेतकऱ्यांचे 66 कोटी रुपये  देणे अद्याप बाकी आहे. ते देणे दिले नाही.शेतकऱ्यांना दिले नाही. असा आरोपही  चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलाआहे.

या बैठकीत बोलताना अमरजीत पाटील म्हणाले,चेअरमन कल्याणराव काळे यांनी सहकारी शिरोमणी साखर कारखाना याचे चेअरमन झाल्यापासून कधीच सभासदांचे कल्याण व्हावे अशा पद्धतीने पावली उचलली नाहीत तसेच शेतकऱ्यांचे कधी या कारखान्यापासून समाधान व्यक्त झाले नाही.

उलट शेतकऱ्यांवरती सहकारी शिरोमणीची आपल्या स्वतःच्या हक्काच्या उसाची बिले वेळेत न मिळाल्यामुळे कर्जाचा डोंगर होऊन त्यांच्यावर आर्थिक संकटे आले आहे. या लोकांच्या गाड्यावरती गाड्या घेण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र शेतकरी व सभासद यांच्या घरामध्ये कधी गाडी येऊ नये अशी या कल्याणकाळें ची भूमिका आहे.

नाव जरी कल्याण असले तरी प्रवृत्ती मात्र खूप वाईट आहे. सभासदांच्या कडे तसेच कार्यकर्त्यांकडे घरात सायकल राहील का नाही याची गॅरंटी नाही. जनकल्याण हॉस्पिटलमध्ये किती लोकांना मोफत औषध उपचार मिळाले हे पाहणे खूप महत्त्वाचे तसेच सहकार शिरोमणी कारखान्याच्या सभासदाचे शेतकऱ्यांचे येणाऱ्या काळात कल्याण झाले पाहिजे.

पुढे बोलताना अमरजीत पाटील म्हणाले,दुष्काळ असताना गुरसाळ्याच्या बंधार्‍यांमधून पाणी शिल्लक असताना याच नेत्यांनी मोठ-मोठे जनरेटर लावून बेकायदेशीर रित्या पाणी पळवले आहे.

ते जनरेटर पोलीस स्टेशनला चार दिवस होते.भाटघरचे पाणी कालवा फोडून कारखान्याला कोणी घेतले सगळ्या तालुक्याला माहित आहे.

खोटे बोलण्याची सुरुवात सहकार क्षेत्रामध्ये कल्याणराव काळे यांच्यापासून झाली आहे.
सहकारी शिरोमणी निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा विचार करण्याची मोठी वेळ आली आहे.

मुळात राज्यात सहकार स्थापन होत असताना यशवंतराव चव्हाण यांनी धनाजीराव गाडगीळ असतील या लोकांनी सहकार स्थापन करत असताना सहकाराशिवाय उदार नाही अशी भूमिका मांडली होती.

यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांची मुले गाड्यावरती फिरली पाहिजे अशी भूमिका होती. मात्र चेअरमन कल्याणराव काळे यांची भूमिका फक्त आपणच मोठे झाले पाहिजे शेतकरी आणि सभासद यांच्या घरी सायकल सुद्धा राहता कामा नये अशी वाईट प्रवृत्ती या चेअरमन कल्याणराव काळे यांची आहे.

कोर्टीच्या सभेमध्ये सभासदांना सांगतात वसंत दादा यांचे उपकार राखावे परंतु त्यांना उलट प्रश्न असा आहे की तुम्ही सभासद ,कार्यकर्ते यांचे उपकार याची जाण ठेवा व या निवडणुकीमधून तुम्ही माघार घ्या.
कारण आज तागायत सहकारी शिरोमणी साखर कारखाना याचे चेअरमन असल्यापासून कधीच सभासदांचे कल्याण व शेतकऱ्याचे समाधान तुमच्याकडून झाले नाही.

दीपक पवार यांनीही आपल्या भाषणात चेअरमन कल्याणराव काळे यांनी पाच ते सहा पक्ष बदललेले त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांनी निष्ठेची भाषा करू नये. असा सल्ला दिला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटीलकल्याणराव काळे

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर... सोलापूर पोलिसांनी केले आवाहन; पोलिसांची सोशल मीडियावर नजर

ताज्या बातम्या

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा