mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

IPL Final : मुंबई व दिल्लीमध्ये आज महामुकाबला; मंगळवेढ्यात बिग स्क्रीनवर पाहता येणार अंतिम लढत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 10, 2020
in मनोरंजन, राष्ट्रीय
IPL Final : मुंबई व दिल्लीमध्ये आज महामुकाबला; मंगळवेढ्यात बिग स्क्रीनवर पाहता येणार अंतिम लढत

समाधान फुगारे । 7588214814

आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.

यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले तरीही त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवताना थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सुरुवातीचे काही सामने जिंकत गुणतालिकेत अग्रस्थान मिळालेल्या दिल्लीला नंतरचे सामने गमावल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण बनले होते.

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार असून यासाठी मंगळवेढा येथील भारत चित्र मंदिर येथील बिग स्क्रीनवर हा महामुकाबला प्रेक्षकांना पाहता येणार असून यामध्ये 140 लोकांना मास्क घालून प्रवेश दिला जाणार असून 100 रुपये तिकिट असल्याची माहिती संचालक दयानंद दत्तू यांनी ‘मंगळवेढा टाईम्स’शी बोलताना दिली.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत.या 27 पैकी 15 सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे.

तर दिल्लीनेही मुंबईचा 12 वेळा पराभव केला आहे. मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव केला. तसेच क्वालिफायर 1 सामन्यातही मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ राहिली आहे.

मुंबईने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजीला आठव्या क्रमांकापर्यंत खोली आहे. तसेच जसप्रीत बुमराह व ट्रेन्ट बोल्ट यांनी पहिल्या स्पेलमध्येच समोरच्या संघातील बलाढ्य फलंदाजंना तंबूत पाठवले आहे. इतकेच नाही तर त्यांनी डेथ ओव्हर्समध्येही आपली अचूकता सिद्ध करताना सर्व संघांना या पाच षटकांत 8 पेक्षा जास्त सरासरीने धावा करू दिलेल्या नाहीत. त्यातही बोल्टचे स्विंग चेंडू तर बुमराहचे यॉर्कर दिल्लीच्या फलंदाजांसाठी धोका ठरणार आहेत.

दोन्ही संघाचे कर्णधार मुंबईकर

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे कर्णधार मूळचे मुंबईकर आहेत. यामुळे या अंतिम सामन्यात हे दोन्ही मुंबईकर खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

शिखर धवनला रोखण्याचे आव्हान

‘गब्बर’ शिखर धवनकडे अंतिम सामन्यात साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. गब्बरने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. धवनने या मोसमात आतापर्यंत एकूण 16 सामन्यात 145.65 च्या स्ट्राईक रेटने आणि 46.38 च्या सरासरीने 603 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर शिखर धवनला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या मोसमात धमाकेदार गोलंजाजी करतोय. तसेच रबाडा या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 14 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांसमोर कगिसोसमोर सावधपणे खेळावे लागणार आहे.

मुंबईची तगडी बॅटिंग लाईनअप

मुंबईकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. यामध्ये क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, कायरन पोलार्ड, पंड्या बंधू यासारखे एकसेएक तगडे फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज आपल्या आक्रमक आणि हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. या सर्वफलंदाजांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. तसेच या सर्व खेळाडूंमध्ये निर्णायक क्षणी सामना पलटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे दिल्लीसमोर या सर्व फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट

मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट ही गोलंदाजांची जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीला या गोलंदाजांपासून सावध राहावे लागणार आहे.

मुंबई संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली संघ

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

नाणेफेक महत्त्वाची ठरणार…

या मैदानावरील खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली आहे. त्यामुळे याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्‍यता आहे. मुंबईनेही क्वॉलिफयरच्या पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्धच द्विशतकी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे मुंबईचे पॉवर हिटर्स या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारून दिल्लीवर दडपण राखण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे नाणेफेकच या सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे.

दिल्लीबाबत बोलायचे झाले तर कर्णधार श्रेयस अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टोनिस व शेमरन हेटमायर या चारच फलंदाजांवर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. सुमार कामगिरीमुळे पृथ्वी शॉ याला संघातील स्थान गमवावे लागत असून आजच्या सामवन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे फारसे पर्याय नाहीत.

कागिसो रबाडा व अनरिच नोर्जे या वेगवान गोलंदाजांनी जरी बळी घेतले असले तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभावही दिसून आला आहे. फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन यानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरीही त्याला धावा रोखण्यात यश आलेले नाही.

अक्‍सर पटेल व मार्कस स्टोनिस यांनीही उपयुक्त गोलंदाजी केली आहे. मात्र, त्यांची गोलंदाजीची मदार रबाडा याच्यावरच राहणार आहे. त्यातही मुंबईच्या पहिल्या पाच पॉवर हिटर्सला रोखण्यासाठी त्यांना आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आयपीएलफायनलमुंबई-दिल्ली

संबंधित बातम्या

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

May 21, 2026
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

हार-शाल नव्हे, आता ‘झाड’ भेट द्या! ‘सावली निवास’वर रंगणार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा पर्यावरणपूरक वाढदिवस सोहळा; निसर्गाला प्राणवायू देण्याचा कार्यकर्त्यांचा मोठा संकल्प

May 18, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा