मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्या सोबत होती. अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचा दावा देखील मोहिते पाटलांनी केला. 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल. या दुष्काळमध्ये वसंत बहरेल अस मोहिते पाटील म्हणाले.

कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते
सोलापुरात राष्ट्रवादी शरद पावर गटचे खासदार धैर्यशील मोहिते आणि सोलापूर विधानपरिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोहिते पाटील बोलत होते. कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते.

त्यांचा हक्क हिरावून घेऊ म्हणून फक्त आम्ही ऑबजेक्शन घेतलं. मतदानाचा पुरावा म्हणून फोटो काढून नेत्यांना दाखवायचं असा विषय होता असे मोहिते पाटील म्हणाले. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः कॅमेरा असलेला गॉगल दाखवल्याचं पाहायला मिळालं.

मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात, मोहिते पाटलांचा सातपुतेंना टोला

मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात असा टोला मोहिते पाटील यांनी माजी आमदार राम सातपुते यांना लगावला. उत्तम जानकर यांचा विषय हा आमच्या घरातला आहे. आम्ही तो विषय घरात मिटवू असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











