mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 21, 2026
in राज्य
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे. मात्र मान्सूने अजूनही पाहिजे तेवढा जोर पकडलेला नाहीये. मान्सून अद्यापही तळकोकणातच रेंगाळला असून, मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनच्या पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

पाऊसच न झाल्यामुळे पेरण्या रखडल्या असून, शेतकऱ्यांच्या मनावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे भारतीय हवामान विभागाकडून (IMD) यंदा पावसावर अल निनोचं सावट असेल असा इशारा देण्यात आला आहे.

अल् निनोमुळे सरासरी पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून राज्यात 20 जूननंतर चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पावसाची प्रतीक्षा अजून वाढली आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?

कोकणातील काही जिल्हे सोडता अद्यापही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेलाच नाहीये. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भाला अजूनही पावसाची वाटच पहावी लागणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसात उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम असून, आता ही प्रतीक्षा आणखी 3 ते 5 दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून अजूनही तळ कोकणात रेंगाळला होता, पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नव्हती. मात्र आता हळुहळु परिस्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात 25 जुलै नंतरच मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे.

मात्र येणारे काही दिवस तापमानाचे राहणार असून तापमान सामान्य पेक्षा जास्त राहील, असा अंदाज नागपूर हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी वर्तवला आहे. दरम्यान उर्वरीत महाराष्ट्रात देखील येत्या 22 जूननंतरच पावसाला सुरुवात होईल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

जय पवार यांची प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रला नुकतीच भेट दिली. यावेळी हवामान खात्याचे तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा दिला.

या चर्चेदरम्यान पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यामध्ये एल निनो (El Niño) चा संभाव्य प्रभाव तसेच इतर महत्त्वाच्या हवामानविषयक घटकांवर चर्चा झाली.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 25 जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यात पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका.

घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन, आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा असं आवाहान यावेळी जय पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
Next Post
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका... 'या' जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार...;  'इतक्या' महिन्यांचा अल्टीमेटम

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा