टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले २०२४-२५ शासकीय हमीभाव तुर खरेदी या योजनेचा शुभारंभ आज दि.२१ मार्च पासून सुरू होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले व सहाय्यक सहकारी संस्था मंगळवेढाचे सहाय्यक निबंधक विजय वाघमारे यांच्या हस्ते तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शेतकरी बांधवांना खरेदी केंद्र संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास संस्थेचे व्यवस्थापक शंभू नामदेव नागणे (९४०५२१४५९५) व खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र भीमराव कोंडूभैरी (९८९०८३१९३४) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले.
दरम्यान, शेतकरी बांधवांनी आमचे कार्यालयाकडून तुर विक्री करण्यासाठी सोडण्यात आलेल्या एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ती घेऊन यावे असे आवाहन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज