मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या भूमीत जगद्व्योती महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या नियोजित स्मारकासाठी जागा निश्चितीनंतर स्मारक उभारणीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.
तसेच स्मारक उभारणी हा केंद्रबिंदू म्हणून स्मारकाच्या जागा निश्चितीसाठी नव्याने समिती गठित केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.
महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत सदस्य समाधान आवताडे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजीत पाटील व विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला.
मंत्री गोरे यांनी सांगितले, जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी यापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती मात्र सध्या ही समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे नव्याने समिती गठीत केली जाईल.
मंत्री गोरे यांनी सांगितले, मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी ही जागा निश्चित उपलब्ध करून देण्याबाबत मंगळवेढा नगरपरिषदेला सूचित केले जाईल. मंगळवेढा येथे जगद्व्योती महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.
कृषी तलावाच्या बाजूची जागा विचाराधीन
महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी कृषी विभागाची जागा प्रस्तावित होती, मात्र ती नाकारल्यानंतर कृषि तलावाच्या बाजूची जागा स्मारकासाठी विचाराधीन आहे. ही जागा देण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज