मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सध्या अवकाळी पावसाचा परिणाम नसला तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
मात्र, पावसापेक्षा विजा, सारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक आहे. सध्या तरी मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.
विदर्भांतील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसावरोवर गारपीट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
मार्चपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने घटण्याची शक्यता असून कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
बंगालच्या उपसागारातील ९०० मीटर उंचीपर्यतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आयतों चक्रीय वारे अशा दोन्हीही वाऱ्यांना
विदभांदरम्यान होणान्या संगमातून ऊबदार बाप्पाचा अवकाशात उर्ध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता निर्माण झाली असल्याचे खुळे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज