mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय खळबळ! देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? तुमच्या जवळचे कोण? अजित पवारांनी झटक्यात सांगितलं नाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 21, 2025
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सर्वात उत्तम मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. दिल्लीसोबत मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत.

एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पद्धतीने संबंध ठेवले आहेत असे अजित पवार म्हणाले. तुमच्या जवळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की एकनाथ शिंदे असा प्रश्न देखील अजित पवार यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं तेच जवळचे. मी सध्या कोणालाही नाराज करणार नाही असे अजित पवार म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीआयडी नेमली आहे. आत्तापर्यंत या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आले नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ज्यावेळी संतोष देशमुखांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आम्हालाही त्याच्या वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे अजित पवार म्हणाले.

या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असे अजित पवार म्हणाले. धनंजय मुंडेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते.

कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका

माझं काम स्टेट फॉरवर्ड असते. बीड असो किंवा पुणे असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केलं. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केलं आहे. त्यांनी राज्यसभेवर जावं असं मला वाटत होतं. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता असेही अजित पवार म्हणाले.

जल, हवाई याचबरोबर रस्ते वाहतूक देखील महत्वाची

कोणताही प्रकल्प हाती घेतल्यावर विरोध होतो, पण मार्ग निघतात असे अजित पवार म्हणाले. दळणवळण होणं महत्वाचं आहे. जल, हवाई याचबरोबर रस्ते वाहतूक देखील महत्वाची असल्याचे अजित पवार म्हणाले.

पुणे विद्येचं माहेरघर आहे. सोयी सुविधा चांगल्या आहेत, त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पिंपची चिंचवडमध्ये कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून लोक तिथं येत आहेत.

पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरु करणार आहोत. रिंग रोड करणार आहोत असे अजित पवार म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर असणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

मंत्री म्हणून काम करतना तारतम्य ठेवून बोललं पाहिजे

औरंगजेबच्या कबरीच्या मुद्यावर देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन राज्य केलं. तिच गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे अजित पवार म्हणाले. या सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचे काम केले.

कारण नसताना ऐकमेकांच्याबद्दल गैरसमज निर्माण करणे मला पटत नाही. त्या कबरीचे प्रकरण आत्ताच कशाला उकरुन काढायचे असे अजित पवार म्हणाले. ज्यावेळेस मंत्री म्हणून आपण काम करतो तेव्हा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ हे मला माहित

मी व्यवहारी माणूस आहे. आमचे 41 आमदार होते. भाजपचे 127 आमदार आले होते, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे त्रिवार सत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ हे मला माहित असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आपण वेळ न घालवता उपमुख्यमंत्री व्हावं असे मला वाटल्याचे अजित पवार म्हणाले.

प्रत्येक पक्ष निर्विवाद सरकार कसं येईल याचा प्रयत्न करणारच आहे असे अजित पवार म्हणाले. मी पण उद्या म्हणेन की सगळ्या जागा लढवायच्या आहेत. पण मला माहित आहेत की किती जागा लढवायच्या आहेत असे अजित पवार म्हणाले.

1985 नंतर राज्यात कधीही एका पक्षाचं सरकार आलं नाही असे अजित पवार म्हणाले. सगळीकडील लोक वेगळा विचार करतात असे अजित पवार म्हणाले. मला वाटत नाही राज्यात कोणाचे एकाचे सरकार येईल, कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते असे अजित पवार म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Next Post
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

महिलांचा आक्रोश! मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील अवैध दारू विक्री बंद करा; सरपंचाने दिले पोलिसांना पत्र

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा