टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी वसलेल्या मारापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी मारापूर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
याबाबतच्या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक मंगळवेढा, पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे दिल्या आहेत.
सरपंच विनायक यादव यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मारापूर हे साडेतीन हजार लोक वस्ती असलेले गाव असून, गावातील नागरिकांचे नेहमीच प्रशासकीय यंत्रणेत सहकार्य असते. मारापूर गावांमध्ये एक ही परवानाधारक दारू विक्री दुकान नाही.
मात्र गावातील काही अल्पसंतुष्ट व्यक्ती अवैधरित्या बाहेरून दारू आणून गावात विकत असल्याने गावामध्ये व्यसनधीनतेचे प्रमाण वाढत आहे. दारू पिऊन सार्वजनिक तसेच शासकीय मालमत्तांच्या
ठिकाणी दांडगाईने प्रवेश करणे, असे प्रकार गावात घडत आहेत. दारूच्या व्यसनामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे.
तरी गावातील अवैध दारू विक्री व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच विनायक यादव यांनी ग्रामपंचायत ठरावाद्वारे पोलीस प्रशासनास केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज