टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येेथील एका 14 वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गणेशवाडी येथील एक 14 वर्षीय मुलगा 31 डिसेंबर रोजी मी शेतातील बोरे खावून येतो असे सांगून घरातून निघून गेला. तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला.
परंतू तो मिळून न आल्याने त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले अशी खात्री झाल्याने त्याच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना. सुरवसे हे करीत आहेत.
—
शेलेवाडी मारहाण प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल
शेलेवाडी येथील दांपत्यास मारहाण व त्यापैकी पतीस काठीने जबर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी त्याच गावातील चौघांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगिता मधुकर दिघे व त्यांचे पती मधुकर दिघे हे 31 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. शेतात राहण्यासाठी पत्रे टाकण्याकरीता खड्डे काढत असताना भास्कर राजाराम दिघे,सुनिता भास्कर दिघे,सिध्दनाथ भास्कर दिघे,दिनेश भास्कर दिघे यांनी जवळ येवून तुम्ही येथे राहू नका,
तुमचा इथे रहायचा काय संबंध, असे म्हणून सदर पती पत्नीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस तुम्ही शिव्या देवू नका असे म्हणताच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीस लाथाबुक्क्याने मारहाण केली व दिनेश भास्कर दिघे याने जवळच पडलेली काठी हातात घेवून मधुकर दिघे यांच्या उजव्या हातावर मारून जखमी करून दमदाटी केली.
या भांडणामध्ये मधुकर यांचे एक गॅ्रमचे बदाम पडून गहाळ झाले म्हणून संगिता दिघे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.पोलिसांनी सदर चार आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना.सुरवसे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज