टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याचा सुपुत्र असलेल्या व ठाणे येथे सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असणार्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकरने थेट पोलिस खात्यालाच आव्हान केल्याने फेसबुक युजर्सची चिंता वाढली आहे.
शनिवार दि. 2 जानेवारी रोजी अज्ञात हॅकरने पैसे कमाविण्याच्या हेतूने चक्क पोलिस अधिकार्यालाच सावज करून त्यांच्या नावाने लोकांना गंडविण्याचा उदयोग सुरु केला आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांचे अकाऊंट त्याने हॅक करून फेसबुक मेसेजव्दारे त्यांच्या सर्व मित्रांना हाय कसे आहात,काय करताय,कुठे आहात असा संदेश पाठवून अडचण सांगून पैसे मागितले जातात.
कधीही पैसे न मागणारा माणूस अडचणीत असल्यामुळेच मागतोय असे समजून ऑनलाईन मनी ट्रान्स्फर करण्याच्या प्रयत्नात असताना त्या अधिकार्याच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्या सहाय्यक फौजदाराने लगेचच माझे फेसबुक अकौंट हॅक करण्यात आले असून कोणीही अमिषाला बळी पडू नये तसेच पैशाची मागणी केल्यास देवू नयेत असा मेसेज टाकल्याने अनेकांच्या लक्षात हा प्रकार आला व लोकांची फसवणूक टळली आहे.
फेसबुकवर अनेक फेक अकाऊंटस आहेत. व पहिल्यांदा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. प्रोफाईलवर महिलेचा फोटो आणि अकाऊंट महिलेच्या नावाने असल्याने काहीजण मोहित होवून लगेच ती रिक्वेस्ट स्विकारतात.
व त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून वेळेअवेळी चॅटींग होते. व चॅटींगच्या नादात आपण फसले गेलेलो आहोत हे फसवणूक झाल्यानंतरच लक्षात येते.
हे प्रकार टाळायचे असतील तर फेसबुकचा वापर हा गरजे पुरताच असावा आणि मेसेंजर डाऊनलोड न केल्यास चॅटींगचा प्रश्न उदभवणार नाही पर्यायाने फसवणूक टळेल असे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज