टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनास अनुसरुन साखर आयुक्त यांच्याकडून मान्य करण्यात आलेला १०० दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी
संत दामाजी सहकारी साखर कारखाना व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोफत माती परीक्षण प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत सदरची प्रयोगशाळा आज दि.१६ एप्रिल ते दि.२३ एप्रिल या कालावधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये केंद्रनिहाय आयोजित करण्यात येत आहे.
मातीचे परीक्षण केल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोणत्या घटकांची कमतरता आहे हे पाहून खते देणे, पीक घेणे सोयीचे होणार आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चारी कोपऱ्यातून व शेताच्या मध्य भागातील सहा इंच खालील माती
लोखंडी हत्यारे न वापरता काढून एकत्रित करुन अंदाजे एक किलो माती प्लास्टिक पिशवीमध्ये भरुन त्यामध्ये एका कागदावर स्वतःचे नांव, गांव, गट नंबर, मोबाईल नंबर इत्यादी लिहून ठरवून दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी समक्ष भेटून वेळेत पोहोच करणेची दक्षता घ्यावी.
सदरच्या मातीचे मोफत परीक्षण करुन कारखाना कर्मचाऱ्यांमार्फत रिपोर्ट घरपोच देण्याची व्यवस्था कारखान्यामार्फत करण्यात येईल.
गटनिहाय मातीपरीक्षण पुढीलप्रमाणे –
आज १६ एप्रिल स.९ वा कारखाना साईटः उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगाव तर दु. ४ वा माचणूर सिद्धेश्वर मंदिर : ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी,
१७ एप्रिल ९ वा. बोराळे येथे बोराळे, अरळी, सिद्धापूर, तांडोर, नंदूर, डोणज १८ एप्रिल मरवडे गट ऑफीस : मरवडे, तळसंगी, भाळवणी, भालेवाडी, बालाजीनगर, कर्जाळ, कात्राळ, कागष्ट, डिकसळ, येड्रराव, खवे, जित्ती, बावची, निंबोणी.
१९ एप्रिल हुलजंती : हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, येळगी, माळेवाडी, पौट, सलगर बु।, सलगर खु।, जंगलगी, मारोळी, लवंगी, २० एप्रिल भोसे : भोसे, नंदेश्वर, हुन्नुर, रडडे, सिध्नकेरी, शिरनांदगी, चिक्कलगी, मानेवाडी, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु.
२१ एप्रिल रोजी पाटखळ : पाटखळ, खडकी, जुनोनी, हाजापुर, शिरसी, जालिहाळ, डोंगरगांव, खुपसंगी, गोणेवाडी
२२ एप्रिल आंधळगाव : आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, लें. चिंचाळे, मारापुर, गुंजेगांव, महमदाबाद शे। गणेशवाडी, शेलेवाडी, २३ एप्रिल मंगळवेढा ऑफिस नागणेवाडी : मंगळवेढा, फटेवाडी, खोमनाळ, हिवरगाव, कचरेवाडी, अकोला, घरनिकी, मल्लेवाडी, देगाव, ढवळस.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज