टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील मुख्य एसटी बस स्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बसची प्रतीक्षा करत असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातील तब्बल ९७ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने लंपास केली आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
खंडाळी येथील रहिवासी असलेले सुभाष दत्तू गिरी गोसावी (वय ७७ वर्ष) हे गुरुवारी, दिनांक ४ जून रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा एसटी बस स्थानकावर आले होते.

स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बस लागल्यानंतर, बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतला. चोरट्याने गोसावी यांच्या पॅंटच्या खिशातील ९७ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या रकमेमध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या भारतीय चलनातील नोटांचा समावेश होता. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच खिशातील रक्कम गायब झाल्याचे गोसावी यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मंगळवेढा पोलीस ठाणे गाठून या घटनेची रीतसर तक्रार दिली.

पोलीस तपास सुरू
वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कृष्णा जाधव करत आहेत. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















