टीम मंगळवेढा टाईम्स :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून पाहणी करण्यात आली.
जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान (भा.प्र.से.) यांनी गावातील विकासकामे, आधुनिक सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.

गावातील विकासकामे, आधुनिक सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, विस्तार अधिकारी, तालुका व्यवस्थापक अधिकारी उमाकांत गोदाम, गटविकास अधिकारी योगेश कांबळे,

विस्तार अधिकारी अशोक नलावडे, रणदिवे, डॉ. बुबडे, तालुका कृषी उपअधिकारी प्रशांत काटे, सरपंच श्रीकांत दवले, उपसरपंच उषा गवळी, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची, आधुनिक उपकरणांची तसेच ‘मिल्क अँड मिलेट व्हिलेज’ या अभिनव संकल्पनेची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली.

कार्यक्रमास मुख्याध्यापक तानाजी कळकुंबे, पवार, कोरे, क्लस्टर को-कॉर्डिनेटर नम्रता काटकर, सीआरपी मनीषा गवळी, आशा वर्कर साधना गवळी तसेच अंगणवाडी सेविका रेखा गवळी, सीमा गवळी व निर्मला शिवशरण उपस्थित होत्या.

पर्यटन विकास क्षेत्र समन्वयक भूषण महाजन, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














