टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नेते, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) मंगळवेढा शहर व तालुक्याच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज मंगळवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा. श्री संत दामाजी हायस्कूलमध्ये खाऊ वाटप करण्यात येणार असून १०.३० वा. ग्रामीण रुग्णालयामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल.
सकाळी ११.०० वा. राहुल शहा यांच्या निवासस्थानी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे व भैरवनाथ शुगर्सचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते राहुल शहा यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आज श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर
श्री विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. त्याचप्रमाणे श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल सुभाष शहा यांचा ५३ व्या वाढदिवसानिमित्त
आज मंगळवार दि.१५ एप्रिल २०२५ रोजी श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराची सुरुवात दि.१५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता होईल.
तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव यांनी केले आहे.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ.औदुंबर जाधव, उपप्राचार्य राजेंद्र गायकवाड, यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज