मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अवकाळी पावसामुळे कमी झालेले तापमान पुन्हा वाढत आहे. काल सोमवार, १४ एप्रिल रोजी तर यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला. रविवारी या वर्षातील सर्वाधिक म्हणजे ४२.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
राज्यात विदर्भआणि मराठवाड्यात सर्वाधिक तापमान आहे. अकोला येथे ४३, नंदुरबार येथे ४३.५ यानंतर सोलापुरात ४२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. सोलापूरसह महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आली असून, उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत.
निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले. उष्णतेची लाट अजूनही काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी उपरणे, कापड, स्कार्फचा वापर केला जात आहे. थंड पेयांची मागणीही वाढली आहे. मात्र, उन्हाच्या झळा जास्त लागत असल्याने १२ ते ३ या वेळेत घराबाहेर न फिरण्याचा सल्ला दिला जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्वचेचे आजारही वाढले आहेत.
पावसाची अपेक्षा
हवामान विभागाकडून १३ ते १५ एप्रिलच्या दरम्यान तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. १३ एप्रिल रोजी पाऊस पडला नाही. मात्र, उर्वरित दिवसात पाऊस पडावा, अशी अपेक्षा सोलापूरकर करत आहे. पाऊस पडल्यानंतरच तापमानात घट होईल.
सात दिवसांत विक्रम मोडला
सोमवार, ७ एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४२.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. अवघ्या सात दिवसांतच यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला गेला.
अद्याप एप्रिल अर्धा महिना व मे पूर्ण महिना शिल्लक असून, या काळात अधिक तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज