मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते.
मात्र, आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी हा ओळख क्रमांक मंगळवारपासून बंधनकारक करण्यात आला. यातून यातून शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भ(जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे.
महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.
७५.८० टक्के नोंदणी
राज्यात १० फेब्रुवारीपर्यंत २१ लाख ६८ हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची तुलना केल्यास ही टक्केवारी ७५.८० इतकी आहे.
नोंदणी कुठे, कशी करावी ?
शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेत शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी तलाठी स्तरावर देखील करता येते.
ज्या शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाणे शक्य नाही, अशांनी गावातील किंवा शेजारील गावात असणाऱ्या सामायिक सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणीनंतर विहित मुदतीत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतो.
तातडीने नोंदणीसाठी कृषी विभागाचे निर्देश
आता कृषी विभागामार्फत याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाइन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच जमाबंदी आयुक्तांना शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या प्रणालीशी एपीआयद्वारे अॅग्रिस्टॅक आवश्यक कार्यवाही करावी.
ज्यांनी अद्याप शेतकरी
ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्यांना तातडीने नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती, सामाईक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
२२ लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिला
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभजलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे. राज्यात १० एप्रिलपर्यंत सुमारे २२ लाख शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज