mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

फडणवीस-राऊत भेटीत भविष्यातील राजकीय भुकंपाची नांदी, जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
फडणवीस-राऊत भेटीत भविष्यातील राजकीय भुकंपाची नांदी, जाणून घ्या

 

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीसांची सामनासाठी मुलाखत घ्यायची असल्याने राऊत त्यांना भेटल्याचा खुलासा भाजपकडून आणि राऊत यांच्याकडूनही करण्यात आलाय. मात्र या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे भविष्यात बदलू शकतात, हे नाकारता येत नाही. 

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. २०१९ साली विधानसभेच्या निकालानंतर भाजप- शिवसेनेचं सरकार स्थापन होईल अशीच शक्यता होती. मात्र भाजपबरोबर सरकार स्थापन करू नये अशी शिवसेनेत पहिली भूमिका मांडली ती संजय राऊत यांनी, एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी स्थापन करण्यात आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आणण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करतायत, यात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबरच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलेलं नाही. त्यामुळेच शिवसेनेतील नेत्यांपैकी संजय राऊत हे भाजपच्या लेखी क्रमांक एकचे व्हिलन ठरले आहेत. दुसरीकडे भाजपनेही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनाला सर्वात जास्त टार्गेट केलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या कायम निशाण्यावर असतात. एवढंच नव्हे तर सुशांत सिंह प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी थेट युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.


या सगळ्यामुळे शिवसेना – भाजपचे संबंध कायमचे बिघडले होते, या दोन पक्षांचे नेते एकमेकांशी राजकीय मैत्री ठेवतील का? असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला होता. संजय राऊत यांनी घेतलेली भेट ही राज्यात राजकीय भूकंप घडवणारी ठरेल अशी चर्चा होती. 

मात्र ही भेट सामनाच्या मुलाखतीसंदर्भात झाल्याचे झी २४ तासने सर्वप्रथम समोर आणले. त्यानंतर फडणवीस आणि संजय राऊत यांनीही हाच खुलासा केला.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, शिवसेनेतेएवढी टोकाची कटुता निर्माण झालेली आहे. तरीही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर कधीही सामना वाचत नसल्याचा दावा करणाऱ्या फडणवीस यांनीही सामनाला मुलाखत देण्याची तयारी दर्शवली. 


त्यामुळे ही भेट आणि पुढे होणारी मुलाखत या दोन पक्षातील कटुता कमी करण्यास फायदेशीर ठरणार आहे. आमची भेट काही राजकीय नव्हती. सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी राऊतांनी विचारणा केली. त्यात माझ्या काही अटी होत्या, ज्या मी त्यांना सांगितल्याचे या भेटीवरील स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय.

आतापर्यंत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पूर्ण बंद असलेली चर्चेची दारं यानिमित्ताने खुली झाली आहेत. त्यामुळं भविष्यात शिवसेना भाजपला एकत्र यायचं असेल तर चर्चा करण्याच्या मार्गाची बीजं राऊत – फडणवीस भेटीत पेरली गेली आहेत. या भेटीने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही शिवसेनेने सिग्नल दिला आहे. 

आघाडीत शिवसेनेचा मान राखला गेला नाही, किंवा शिवसेनेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासाठी भाजपचा पूर्वीचा मार्ग आता खुला असल्याचा इशाराही या भेटीने दिला गेलाय. 


तर यातून एक तोटाही संभवतो. तो म्हणजे, जर शिवसेना – भाजपची जवळीक वाढली तर राष्ट्रवादीही भाजपशी जवळीक साधू शकते. तेव्हा शिवसेनेला राष्ट्रवादीला दोष देता येणार नाही.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सध्या राज्याच्या राजकारणात भूकंप होणार नाही. मात्र राजकारणत कुणीही कुणाचा कायमची शत्रू किंवा मित्र नसतो या न्यायाने भविष्यात या भेटीमुळे राजकीय भूकंप होऊ शकतो. 


राज्याच्या राजकारणात जर शिवसेनेबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, तर भविष्यात भाजप – शिवसेना पुन्हा एकत्र येणारच नाहीत, असं कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. । दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई

the forerunners of future political earthquakes in the Fadnavis-Raut meeting

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील डॉ.प्रशांत नकाते यांना बलात्कार प्रकरणात ‘या’ अटीवर जामीन मंजूर

मंगळवेढ्यातील डॉ.प्रशांत नकाते यांना बलात्कार प्रकरणात 'या' अटीवर जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा