mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 17, 2026
in राजकारण, राज्य
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी  प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.

आयोगाच्या या आदेशामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची औपचारिक तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

१५ एप्रिल २०२६ ची यादी ठरणार पाया

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करताना स्पष्ट केले की, या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्याच मतदार यादीचे संगणक प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजन करून ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या तयार करण्यात येतील.

यापूर्वी ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही ठिकाणच्या त्रुटी किंवा अनवधानाने वगळल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडतही घेण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे काही भागांत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात विलंब झाल्याने, अशा ग्रामपंचायतींसाठी २४ जुलैपर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम

अधिसूचनेनंतर आता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे:

२४ जुलै : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

२४ ते २९ जुलै : नागरिकांना यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाईल.

४ ऑगस्ट : प्राप्त हरकतींची नियमानुसार छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

‘महाआयटी’च्या संगणक प्रणालीचा वापर

मतदार यादी तयार करण्यासाठी ‘महाआयटी’ने विकसित केलेल्या विशेष संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांना आयोगाकडून युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिल्यानंतर तहसील कार्यालयांना स्वतंत्र लॉगिन देण्यात येईल.

त्यानंतर संबंधित तहसीलदार ग्रामपंचायतीनिहाय मास्टर डेटा भरतील. विधानसभा मतदार यादीचा ‘मदर रोल’ डाउनलोड करून ‘कंट्रोल चार्ट’ तयार केला जाईल आणि त्याच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाईल.

चूक न करण्याच्या आयोगाच्या सक्त सूचना

आयोगाने मतदार यादी तयार करताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभा मतदार यादीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश झाला पाहिजे, तसेच ग्रामपंचायतीबाहेरील कोणत्याही मतदाराचा समावेश होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेदरम्यान विधानसभा मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा नाव व पत्ता यामध्ये बदल करणे शक्य नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींमध्ये केवळ तांत्रिक किंवा लेखनिक चुका, चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले मतदार किंवा संबंधित प्रभागातील पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास अशाच मर्यादित दुरुस्त्या करता येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आणि प्रभाग तपासून आवश्यक असल्यास वेळेत हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश

आयोगाने प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देशही दिले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर ही मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे आणि केबल टीव्हीच्या माध्यमातूनही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत, पारदर्शक आणि बिनचूक पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन आवश्यक अहवाल राज्य निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
Next Post
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा