मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या नामनिर्देशित सदस्यांची संख्या, पात्रता आणि नियुक्तीची प्रक्रिया निश्चित केली आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे.

नव्या नियमानुसार पंचायत समितीमध्ये एकूण निवडून आलेल्या सदस्यसंख्येच्या २० टक्के किंवा किमान एक, यापैकी जी संख्या अधिक असेल, तितके नामनिर्देशित सदस्य असतील. जिल्हा परिषदेत निर्वाचित सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा किमान पाच, यापैकी अधिक संख्या नामनिर्देशित सदस्यांची असेल.

नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणे आणि पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनाशी संबंधित विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणे आवश्यक आहे.

कृषी, वैद्यकीय, शिक्षण, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना पात्रतेत स्थान देण्यात आले आहे.

दीर्घकाळ शासनसेवा केलेले सेवानिवृत्त अधिकारी तसेच सामाजिक कल्याण क्षेत्रात कार्यरत अनुभवी अशासकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही विचार करता येणार आहे.

नामनिर्देशन करताना जिल्ह्यातील मान्यताप्राप्त किंवा नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी अथवा फ्रंट यांच्या तौलनिक संख्याबळाचा विचार केला जाईल. जागांचे वाटप पूर्णांक व पात्र अपूर्णांकाच्या आधारे होईल. समान अपूर्णांक आल्यास सोडतीने जागा निश्चित केली जाईल.

जिल्हाधिकारी संबंधित पक्ष, गट, 3 आघाडी किंवा फ्रंटशी सल्लामसलत करून पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करतील. जिल्हा परिषद या शिफारशींचा विचार करून नामनिर्देशन करेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














