टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याचा दावा करणारी आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेली दुष्काळाची यादी पूर्णपणे बनावट असल्याचे सोलापूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा चार्ट वापरून नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियमांनुसार दुष्काळ घोषित करण्यासाठी तीन टप्पे म्हणजे ट्रिगर पार करावे लागतात. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि प्रशासकीय यंत्रणेस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती, टँकरची गरज आणि चाऱ्याची उपलब्धता यांचा अंतिम अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता सरकारच अधिकृत शासन निर्णयाद्वारे दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करेल.

मात्र, त्याआधीच सोशल मीडियावर दुष्काळ जाहीर झालेल्या सोलापूरसह सातारा आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची यादी व्हायरल झाली. आता ती यादी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणीही वंचित राहणार नाही
अजून तरी दुष्काळाची घोषणा किंवा यादी जाहीर झालेली नाही. व्हायरल होत असलेली यादी खोटी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला तालुका नसल्याचे ऐकून चिंताग्रस्त होऊ नये. एकही तालुका आणि शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















