मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विकास कामाच्या रकमेचा चुकीच्या पद्धतीने खर्च करीत अपहार केल्याप्रकरणी फताटेवाडीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र (प्रेम) राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव आणि ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यावर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.
विनोद रमेश चव्हाण (फताटेवाडी, दक्षिण सोलापूर) यांनी आर्थिक ता. ग्रामपंचायतीच्या घोटाळ्याविरोधात सातत्याने तक्रारी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, राज्याचे लोकायुक्त आणि पुणे विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यात आली.
अपहार उघडकीस आल्यानंतर पंचायत समितीच्या वतीने सदाशिव कोळी यांनी पोलिसात धाव घेतली. वळसंग पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबाबदार धरून सरपंच हरिश्चंद्र (प्रेम) राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव आणि तत्कालीन ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या ग्रामपंचायतीत दि. १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ आर्थिक अपहार झालेला आहे. या ग्रामपंचायतीत तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये नोंद न घेता निधीचा अपहार करणे, रोखीने खर्च करणे,
एकाच कामावर दोनवेळा रक्कम खर्च करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत लेखा
संहिता नियम ५१ चे पालन न करणे, निविदा न काढता व्यक्ती अथवा संस्थाना देयके अदा करणे, एकाच ठेकेदाराला त्याची कामाची क्षमता न तपासता भरमसाठ कामे देणे, काँक्रीट रस्त्याचे अनियमित काम करणे आदी बाबीमध्ये तथ्य आढळल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल दिला.
अपहाराची रक्कम..
वर्षभराच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचा सपाटा सुरू होता. अनेक लोकोपयोगी योजनाही ग्रामपंचायतीने जाहीर केल्या होत्या. या काळात मोठी आर्थिक उलाढाल झाली असून ४ कोटी ४३ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हद्दीबाहेर खर्च करणे महागात
सदर ग्रामपंचायतीने हद्दीबाहेर होटगी स्टेशनच्या हद्दीत कामासाठी रकमेचा खर्च केला आहे. साहित्याची खरेदी करताना पोर्टलचा वापर केला नाही. आरओ प्लांटमधून मिळणारी रक्कम परस्पर खर्च करणे आदी प्रकारही चौकशी अधिकाऱ्यांच्या स्थळ पाहणीत निदर्शनास आले.
अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपसरपंच राजेंद्र जाधव आणि ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यासह तिघेही फरार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
एनटीपीसीच्या निधीचा गैरवापर
फ्ताटेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोलापूर थर्मल पावर (एनटीपीसी) प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कराची रक्कम मिळते.
गतवर्षी एनटीपीसीने या ग्रामपंचायतीला ५ कोटीपर्यंत निधी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ओळख झाली होती. निधीचा गैरवापर केल्याचे प्रकरण सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना भोवले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज