मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सीआरपी यांच्यावर सोपविण्यात आले होती.
प्रत्येक भरण्यात आलेल्या अर्जाला पन्नास रुपये भत्ता देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी शासनाकडून १ कोटी ३७ लाख ७७ हजार ७०० रुपये प्राप्त झाले आहेत.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह इतर यंत्रणांना भत्ता वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे कार्यरत असणाऱ्या ३ हजार २८३ अंगणवाडी सेविकांनी २ लाख २१ हजार ९४ तर २०४ मदतनिसांनी ९ हजार १३५ अशा एकूण २ लाख ३० हजार २२९ लाडक्या बहिणींचे अर्ज यशस्वीरित्या भरले होते.
प्रति अर्ज पन्नास रुपये प्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे १ कोटी १५ लाख ११ हजार ४५० रुपये शासनाकडे येणे होते.
ती रक्कम जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून योजना संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दोन दिवसात सीडीपीओ मार्फत वाटप : मिरकले
सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज यशस्वीरित्या भरल्या आहेत. त्यांचे प्रति अर्ज पन्नास रुपयेप्रमाणे मानधनाचे अंतिम बिल मंजूर झाले आहे.
दोन दिवसात तालुकास्तरावरून सीडीपीओ मार्फत वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज