टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर येणाऱ्या गुढीपाडवा सणाचे निमित्ताने २४ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत ३४ केंद्रावरुन वाटप करणेत येणार आहे.
प्रतिशेअर्स २५ किलो या प्रमाणात प्रतिकिलो २० रूपये या सवलतीचे दराने साखर देण्याची व्यवस्था करणेत आली असून सर्व सभासदानी साखर लाभ घेण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.
कारखाना कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणच्या ३४ केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर
कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी सकाळी १० ते ५ या वेळेत डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊस बिल अॅडव्हान्स येणे, बेणे अॅडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे
तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणे बाकी असणाऱ्या सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नसल्याची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
याप्रसंगी व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे,
बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज