mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! मराठा समाज जिंकला, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 7, 2023
in राज्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब शासकीय महापूजेला हजर राहणार; किती वाजता असणार पूजा? जाणून घ्या शेड्यूल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिंधीशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करताहेत.

मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्देवी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून १२ आणि १३ टक्के आरक्षण दिले होते.

शिंदे म्हणले, हे आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या धक्का लागला नव्हता. पण दुर्दैवाने हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. मध्यंतरी तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यावर योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही,याची मराठा समाजाला कल्पना आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाचे हे रद्द झालेले आरक्षण पुन्हा परत मिळावे यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील. ते आम्ही करणार आहोत.

सर्वोच्च न्यायालयात देखील आपली क्युरेटिव्ह याचिका प्रलंबित आहे. त्याबाबतही विनंती करणार आहोत. त्याचबरोबर समाज हा सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र आयोग नियुक्त केलेला आहे.

त्याचबरोबर अनेक नामवंत तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्यामध्ये ऍड. हरिष साळवी यांच्या सारखे ज्येष्ठ विधीज्ज्ञ देखील आहेत. या सगळ्याची मदत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करेल.

यातून निश्चित मराठा समाजाचे हे रद्द झालेले आरक्षण परत मिळेल. मराठा समाजाला इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आरक्षण दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असेच प्रयत्न सुरु आहेत. यात कुणीही या दोन्ही समाजातील बांधवांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.(स्रोत:saam tv)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा आरक्षणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! पीएम किसान योजनेतील लाभार्थीनी ई-केवायसीचा आज अखेरचा दिवस; तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 29, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा