टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील येड्रॉव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ३५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ही घटना आज बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती.
दरम्यान फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक दीपक धोत्रे यांनी जखमींवर उपचार केले एकजण मयत झाला असून आठ जणांना पुढील उपचारासाठी इतर दवाखान्यात रेफर करण्यात आहे २९ जण स्टेबल असल्याची माहिती दीपक धोत्रे यांनी बोलताना दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज