टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या गुरुवार दि.19 जानेवारी रोजी मूत्रविकार तज्ञाकडून तपासणी व खास महिलांसाठी त्वचारोग तज्ञाकडून तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच महिलांसाठी त्वचारोग तज्ञांकडून विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर उद्या गुरुवारी दि.19 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे.
सर्व प्रकारचे त्वचाचे आजार चेहऱ्यावरील पिंपल्स एक्झिमा त्वचेवरील कोड, इत्यादी
प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहे.
डॉ.प्रियंका दोडके या तपासणी करणार आहेत तर पहिला व तिसरा गुरुवार दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत उपलब्ध देखील असणार आहेत.
तसेच मंगळवेढा शहरात प्रथमच मूत्रविकार तज्ञाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
डॉ.सचिन बोटे हे किडनी, मूत्रविकार, मुतखडा, कॅन्सर, लेप्रोस्कोपी व किडनी प्रत्यारोपण तज्ञ आहेत. तसेच दहा वर्षाचा मूत्ररोग, मुतखडा, किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
डॉ.सचिन बोटे हे तपासणी करणार आहेत तर पहिला व तिसरा गुरुवार दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत उपलब्ध देखील असणार आहेत.
उद्या होणाऱ्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज