टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी अहवालात दिला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकार्याच्या आदेशानुसार सोलापूर वैधमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भरारी पथकाने अचानक भेट देवून भैरवनाथ साखर कारखान्यातील वजन काट्याची तपासणी केली. तपासणीनंतर हे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कारखान्याचे संस्थापक ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित सदैव डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालविला जातो.
यावेळी व्हा.चेअरमन अनिल सावंत म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. येथे नेहमीच पारदर्शक पद्धतीने काम केले जाते.
आजच्या भरारी पथकाच्या तपासणी नंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. या तापासणीमध्ये कोणताही गैरप्रकार अथवा त्रुटी नसल्यामुळे पुन्हा एखदा भैरवनाथ साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांचा विश्वास संपादन केला आहे.
भरारी पथकाचे प्रमुख सोलापूर वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक पी.एच.मगर, उपनियंत्रक अ.ध.गेटमे, लेखापरीक्षक अ.नि.बचुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक कारखान्यातील ऊस वजन काट्याची तपासणी केली.
यावेळी ऊसाने भरलेल्या वाहनांची कसून तपासणी केली तसेच ऊसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली.
यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व वाहन चालक हजर होते.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, प्रॉडक्शन मॅनेजर बाळासाहेब शिंदे, एच आर मॅनेजर संजय राठोड, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील तसेच कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज