मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी १५ जागांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत होती. अखेरच्या दिवशीपर्यंत १५ जागांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत.
काल दि.१ जुलै रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये संचालक मुझफ्फर काझी यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून, आज बुधवारी त्यावर निकाल देण्यात येणार आहे.
वैध अर्ज यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत बँकेच्या १४ हजार ५९२ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोलापूर, सहायक निबंधक कार्यालय मंगळवेढा, नगरपालिका व बँकेत येथे प्रसिद्ध करण्यात आली होती.
दि.१५ जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. २८ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज