टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 28 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक उन्हात या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तापणार आहे.
सध्या 10 फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील जवळपास 19 ग्रामपंचायतची मुदत संपणार असल्यामुळे या ग्रामपंचायतीचा गाडा प्रशासकाच्या हाती सोपवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
त्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधी निश्चित करून तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रभाग रचना निश्चित होणार आहे आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या चक्राकार प्रमाणे निश्चित केली जाणार आहे.
त्यामध्ये तहसीलदार यांनी गुगल अर्थ च्या साह्याने नकाशे तयार करून सुपर कंपोज करून गाव नकाशा तयार करणे 30 जानेवारी, तलाठी ग्रामसेवक संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सिमी निश्चित करणे 7 फेब्रुवारी, तहसीलदाराच्या अध्यक्षेतेखाली प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे,
सदर समितीमध्ये गटविकास अधिकारी व मंडल अधिकारी समावेश असेल 15 फेब्रुवारी,सदर समितीने प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेला सादर करणे 21 फेब्रुवारी,
जिल्हाधिकाऱ्यांनी नमुना ब (प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करून आवश्यक असेल तर दुरुस्त्या करणे मान्यता देणे 3 मार्च ,
या दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता देणे 14 मार्च, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवणे प्रभाग रचना हरकती व जाहीर सूचना प्रसिद्ध करणे 17 मार्च,
प्रारूप प्रभाग रचनेस हरकती सादर करणे 24 मार्च, प्राप्त हरकती व सूचना सुनावणीसाठी 28 मार्च ,प्राप्त हरकतीवर सुनावणी घेणे 6 एप्रिल,
आलेल्या हरकतीनंतर अभिप्राय नोंदवून जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करणे 11 एप्रिल, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखल केलेला प्रस्ताव जिल्हाधिकारीनी तपासून राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे 17 एप्रिल,
राज्य निवडणूक आयोगाने मान्यता अंतीम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी 25 एप्रिल रोजी देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचे उपसचिव मनोज जाधव यांच्या सहीने निश्चित केला आहे.
आणि त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या संभाव्य ग्रामपंचायतमधील बहुतांश ग्रामपंचायतीमधील मतदार हे ऊस तोडणीच्या निमित्ताने जिल्ह्याबरोबर जिल्ह्यात गेलेले आहेत त्यामुळे यांना निवडणुकीसाठी आणावा लागणार खर्च भावी सरपंचाचा वाचल्यामुळे हे सरपंचाचे उमेदवार निर्दास्त झाले आहेत.(स्रोत:सकाळ)
या ग्रामपंचायत होणार प्रभाग रचना
आंधळगाव, नंदूर,लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार , मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, भाळवणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज