mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2026
in मंगळवेढा
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर व मंगळवेढा विभागात वीज पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत काल गुरुवारी मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन उन्हाळ्यात विजपुरवठा अधिक सुरळीत राहावा यासाठी सतर्क राहावे.

याचबरोबर जळालेला ट्रांसफार्मर तीन दिवसाच्या आत मध्ये द्या, पण शेतीपंपाची विज पूर्ण दाबाने आठ तास द्या आणि सिंगल फेज वीज पूर्ण दाबाने द्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याचबरोबर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना शेतकऱ्यांशी नम्रतेने बोलण्याबाबतच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा व्हावा. यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले.

याप्रसंगी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेएन यांच्याशी

दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वीज पुरवठ्या बाबत येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

वाढत्या उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच वीज जळण्याच्या घटनांत वाढ झाल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत अनेक भागांतील वीज ट्रांसफार्मर जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तासन्तास वीजपुरवठा बंद राहिला. जळालेले अनेक ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पडून असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये जवळपास 45 ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी ऑइल नसल्यामुळे थांबलेले होते, त्यावेळी आमदार अधीक्षक अभियंता यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवून 2000 लिटरची व्यवस्था करण्यास सांगितले त्यामुळे पेंडिंग असलेले 45 ट्रांसफार्मर लवकरात लवकर देण्यास सांगितले तसेच वाढलेल्या भारामुळे ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांवर ताण येत आहे.

दरम्यान, भीमा नदीत पाणी सोडण्यात आलेले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार औज आणि  हील्ली बंधाऱ्यापर्यंत पोहचे पर्यंत वीज पुरवठा तीन तास करण्यात आला होता आता त्याठिकाणी पाणी पोहचले असून वीजपुरवठा सुरळीत करणे संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी सांगून वीज पुरवठा पूर्वत करण्यात यावा असे सांगण्यात आला.

दोन्ही तालुक्यात कमी दाबाने वीज मिळत असल्याने नागरिकांना उकाड्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या मोटारी, शेतीपंप आणि घरगुती उपकरणे व्यवस्थित सुरू राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीदरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जळालेले डेपो त्वरित दुरुस्त करावेत, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत तसेच कमी दाबाची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या.

तसेच कार्यकारी अभियंता शिंदे सर्व अधिकारी यांना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नागरिक व शेतकरी यांच्याशी नम्रतेने बोलण्यात व वागण्यात यावे अशा सूचना दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता शिंदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता देवकर, उपकार्यकारी अभियंता मरळी, उपकार्यकारी अभियंता अकोलकर, मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती सौ दिपाली ताड, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन शिवशरण, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, विजय माने, श्रीमंत म्हेत्रे, सचिन चव्हाण, दत्ता यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
Next Post
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण

May 17, 2026
सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाची गरज; शेतकऱ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! विमानासारखं सीट बुकिंग आणि ५ पटीने जास्त स्पीड; काय आहे रेल्वेचा नवा प्लॅन? रेल्वे प्रवासात मोठा बदल

May 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दहावीत ९१ टक्के! ‘अभ्यास कर’ म्हणणे एवढे झोंबले? नवीन मोबाईल आणल्यानंतर काही तासांतच १६ वर्षांच्या शिवमचा टोकाचा निर्णय

May 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा; रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा

May 17, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार

May 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा