टीम मंगळवेढा टाईम्स।
आंग्लभाषा तज्ञत्व म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद ही संस्था राज्यस्तरावर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी व शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे उपक्रम राबविले जातात.
तेजस, स्पोकन इंग्लिश, मुक, राईट टू रीड, रीड टू मी, चेस इ. उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविले जात आहेत. या उपक्रमामधे उत्कृष्ट काम केलेल्या संस्था, अधिकारी व
शिक्षक यांना त्यांचे कामकाज अधिक प्रभावीपणे सादरीकरण करता यावे आणि त्याचे समाईकीकरण करता यावे यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले जाते.
सीएसआर अंतर्गत या वर्षाचे चर्चासत्र दलितमित्र कदम गुरूजी सायन्स कॅालेज मंगळवेढा येथे उद्या शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी आयोजित केले आहे.
या चर्चासत्रास शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, एससीईआरटी पुणे संचालक राजेश पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, संचालक डॅा.कलमोद्दिन शेख, प्राचार्य डॅा. रामचंद्र कोरडे,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद येथील विभागप्रमुख डॉ विशाल तायडे, डॉ उज्ज्वल करवंदे, डॉ प्रमोद कुमावत, एससीईआरटी इंग्रजी विभागप्रमुख डॅा. अरुण सांगोलकर आणि डाएट विभागप्रमुख डॅा.इब्राहिम नदाफ आदी अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील एक अधिकारी व इंग्रजी उपक्रम प्रभावीपणे राबविणारे चार कृतीशील शिक्षक असे प्रत्येक जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
इंग्लंड येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक निसार शेख व सुयोग दिक्षित हे इंग्लंड येथून सहभागी होणार आहेत तर अमेरिका येथून फुलब्राईट स्कॅालर डॉ शिवाजी देशमुख हे सहभागी होतील.
या चर्चासत्रात इंग्रजी विषयाचे सर्वोत्तम पद्धती, इंग्रजी विषयाचे अध्ययन, अध्यापन आणि मुल्यमापनातील नवीन बदल, पोस्टर सादरीकरण आणि एनईपी, नॅस आणि एफएलएन नुसार इंग्रजी या विषयावर सादरीकरण आणि चर्चा केली जाणार आहे.
सदर चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे अध्यक्ष ॲड.सुजीत कदम संस्था परिवार डाएट वेळापूर मधील सर्व अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज