टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते, रतनचंद शहा सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन स्व.रतनचंद शिवलाल शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त
आज गुरुवार दि.25 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती स्व.रत्नप्रभा प्रतिष्ठानचे राहुल शहा यांनी दिली.
आज गुरुवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ८.३० वा.श्री संत दामाजी महाविदयालयामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन प्राचार्य औदुंबर जाधव यांनी केले आहे.
सकाळी ९.३० वा. शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून सकाळी १०.३० वा. मुकबधिर विदयालयामध्ये खाऊ वाटप होणार आहे.
सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत रतनचंद शहा बँकेसमोरील पटांगणामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. नॅब नेत्र रुग्णालय, मिरज यांच्या सौजन्याने हे शिबीर होत आहे.
सायंकाळी ५.३० वा. रतनचंद शहा बँकेसमोरील पटांगणामध्ये स्व.रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन होत असून
सायंकाळी ६.०० वा. खोपोलीचे वक्ते प्रशांत देशमुख यांचे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.रत्नप्रभा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज