mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाचा अंदाज! पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2023
in राज्य
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील 48 तास राज्यासह देशात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्याच्या हवामानावर देखील दिसून येणार आहे.

7 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

48 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

पुढील 48 तासांत अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 ते 9 डिसेंबर दरम्यान पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. तर 5 आणि 7 डिसेंबरला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे.

पुढील 24 तासांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 8 ते 9 डिसेंबरला हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह कोकणात कोरडं हवामान

पुढील पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

मुंबईसह कोकणात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. थंडीची प्रतीक्षा कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस वातावरणात जास्त बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळाचं संकट, अवकाळी पावसाचा तडाखा

तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळलं आणि कमकुवत झालं. चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील बापटलापासून 25 किमी पश्चिम-वायव्येस आणि ओंगोलच्या 60 किमी उत्तर-ईशान्येस दक्षिण किनारपट्टी भागात धडकलं.

चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत असून पुढील काही तासात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्यावरील तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग गेल्या 06 तासांत 10 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पावसाचा फटका

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वराची ‘ही’ माहिती छापणे बंधनकारक होणार

June 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 27, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 25, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 28, 2026
Next Post
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

बाबो..! सोलापूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं 'एवढ्या' कोटींच घबाड; पत्नी, मुलगासह तिघावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा