mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, शैक्षणिक
ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स । करोनाचे संकट वाढत असताना पेठ तालुक्यातील वाडी, वस्तीवर शाळा बंद आहेत. या मुलांनाभ्रमणध्वनीअभावी ऑनलाइन शिक्षणही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत ३० गावांमध्ये घराघरात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सोशल नेटवर्किंग फोरमने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. 

हे साहित्य फोरमच्या ग्रामसमन्वयकांनी (एस.एन.एफ.) संकट काळात सामाजिक जबाबदारी निभावत जवळपास तीन हजार बालकांच्या घरापर्यंत पोहचवले. फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या पुढाकाराने गाव तेथे एस.एन.एफ. या अभियानात गावागावात सामाजिक कार्याची उर्मी असलेल्या युवकांना एकत्र करून भक्कम फळी तयार करण्यात आली. 

याच ग्राम समन्वयकांचे आयोजन, नियोजन आणि संयोजनातून शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम  यशस्वी करण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमच्या व्यासपीठावरून युवा  ग्राम समन्वयकांनी आपली जबाबदारी उत्तम रितीने बजावत आपल्याच बंधू-भगिनींना ज्ञानार्जनासाठी साहित्य पोहचविले. फोरमचे प्रमुख गायकवाड यांनी एस.एन.एफ. ग्रामसमन्वयक संकल्पना विषद केली. आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या असतात. 

या समस्या वेळेवर फोरमपर्यंत पोहोचल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतात. यासाठी गाव तिथे ग्रामसमन्वयक ही संकल्पना आम्ही राबवली आहे. आनंदाची बाब म्हणजे या समन्वयांकडून अनेक समस्या आमच्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. 

त्यापैकी काही सोडवण्यातही फोरम यशस्वी ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक तरूणांनी या सामाजिक कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे.

Distribution of educational materials to students deprived of online education;  Social Networking Forum Initiative

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 20, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून 'ही' असणार, 'या' नियमांचे असणार बंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा