टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी
खुपसंगी येथील जगदाळे वस्ती शाळेची जुनी इमारत पाडून तब्बल सहा महिने उलटले, मात्र इमारतीचा धोकादायक अवशेष अद्यापही हटविण्यात आलेला नाही. ढिगाऱ्याच्या ठिकाणी आता थेट विषारी साप आढळून येत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामपंचायत व पंचायत समिती, शिक्षण विभाग प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत पालक संतप्त झाले आहेत
शाळा परिसरात पडलेला जुन्या इमारतीचा मलबा हा विषारी किडे व सापांचे सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल घोडके तसेच पालकांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून या धोक्याची कल्पना दिली. मात्र, ढिम्म प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली होती. दोन दिवसांत हा धोकादायक अवशेष हटवण्याच्या सूचना देऊन अधिकारी निघून गेले, मात्र या घटनेला दोन महिने उलटूनही जागेवर प्रत्यक्ष काहीच कार्यवाही झालेली नाही.

केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
विद्यार्थ्याला साप चावला तर जबाबदार कोण?
शाळेच्या आवारात रोज सापांचा वावर दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला थेट धोका निर्माण झाला आहे. निष्पाप विद्यार्थ्याला दुर्दैवाने साप चावला किंवा या धोकादायक ढिगाऱ्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

केवळ पाहणी नको, थेट कारवाई हवी!
सहा महिन्यांपासून रखडलेला हा गंभीर प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा. नुसती पाहणी आणि पोकळ सूचना देण्यापेक्षा तातडीने धोकादायक अवशेष हटवून शाळेचा परिसर सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












