mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 13, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर,तांडोर, मिरी येथून भीमा नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा हे वाळू माफिया कायद्याचे उलंघन करुन, नियम व आटी पायदळी तुडवून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा करत आहेत.

संबंधित आधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा अधिकारी चिडीचूप आहेत तरी हा वाळू ठेका रद्द करावा अशी मागणी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मिरी, सिध्दापूर येथून भीमा नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करताना कायद्याचे उल्लंघन होत आहे.

बेकायदेशीर अवैध वाळू उपसा होत असलेली माहिती रोजच्या रोज पाठवली. परंतू अधिकाऱ्यांच्या वागण्यातून व सर्व पुरावे देऊन देखील अधिकाऱ्याकडून अवैध वाळू माफियावर कार्यवाही केली जात नाही.

उलट आम्ही वरील अवैध वाळू माफियांच्या विरुध्द तक्रार देऊन ऑफिसच्या बाहेर येईपर्यंत अधिकाऱ्यांकडुन वाळू माफियांना माहिती दिली जाते. व आम्हाला जिवे मारण्याच वेगवेळे कट रचले जातात.

मिरी ता.मोहोळ, तांडोर ता.मंगळवेढा मिरी, सिध्दापूर येथून भिमा नदी पात्रातून वरील वाळू माफिया बेकायदेशीर रित्या परवानगी नसताना देखील भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साह्याने रात्रन दिवस रोज २०० ते ३०० हायवा, १० टायर गाडीने अवैध वाळू उपसा सुरु आहे.

रोज जवळ पास २ हजार ब्रास अवैध वाळू उपसा होत आहे. वरील अवैध वाळू माफियांना ठेका देते वेळेस मिरी गट नं. ४९, ४८, ४५, ४४, ४१, ४०, ३३ सिध्दापूर गट नं. ४८५, ४८६ हे गट देण्यात आले आहेत. परंतु या गटामध्ये संपुर्ण वाळू दुसरीकडे केला आहे.

वरील अवैध वाळू माफिया हे बेकायदेशीर बिगर पावती अवैध रात्रंदिवस वाळू उपसा करीत आहेत सदर वाळू माफियांचा ठेका फक्त ८ ते १० दिवसात संपून जाणार आहे. शिल्लक दिवसात बेकायदेशीर वाळू उपसा करुन महाराष्ट्र शासनाचे व

भीमा नदी पात्राचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. वेळोवेळी पुराव्या निशी लेखी तक्रार देऊन, मोबाईलवर फोन करुन, वॉटस् अप वरती सर्व पुरावे देऊन देखील संबधीत अधिकाऱ्यांनी पदाचा गैर वापरकरुन वाळू माफियांना अवैध वाळू उपसा करण्यासाठी शासकीय यंत्रनेची ताकद दिली आहे.

त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये खरे वाळू माफिया हे वरील अधिकारीच आहेत की काय ? असा संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप शरद कोळी यांनी केला आहे.

जर अधिकाऱ्यांनी वाळू माफियांशी संगमत केले नसते तर वरील अवैध वाळू माफिया वरती त्यांनी तात्काळ कारवाईया केल्या असत्या परंतु हात मिळवणी केल्यामुळे डोळे असून आंधळ्याची भुमिका घेतली गेली आहे.

आणि पुराव्या निशी लेखी तक्रार दिल्यानतंर संबंधित अधिकारी यांनी माझ्यावर चिडुन जाऊन वाळू माफिया गुंडाशी संगनमत करुन मला जिव मारण्याचा कट रचला आहे.

कारण माझ्या तक्रारीवरुन खुप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा या मुर्दाड वाळु माफियांना जबर बसावी यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अवैध्यरित्या शासनाचे नियम मोडून सुरु असलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी केली आहे.

तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल नाही घेतली तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. – शरद कोळी, संस्थापक अध्यक्ष, धाडस सामाजिक संघटना.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसाभीमा नदी

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
Breaking! राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात; पहाटेपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांना ईडीचा मोठा झटका; मुंबईसह 'या' जिल्ह्यातील संपत्ती केली जप्त

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा