mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 14, 2026
in राज्य
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी तुकाराम मुंढे सज्ज झाले आहेत. FDA चे आयुक्त म्हणून ते धडाडीने काम करत आहेत. दुधामध्ये असो किंवा इतर अन्न पदार्थांमध्ये असो भेसळ केली जाते. ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोतच.पण समाज म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं परखड मत तुकाराम मुंढेंनी मांडलं आहे.

आपण काय खातो? त्याकडे आपलं नुसतं लक्ष नाही तर कटाक्षाने लक्ष देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपल्या ज्या सवयी आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या बदलल्या पाहिजेत. लहान मुलांना काही उत्पादनं विकू नयेत याचेही नियम आहेत. शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुख्याध्यापकांनी ही कारवाई करायची असते.

शाळेच्या ५०० मीटरच्या परिघात ज्यावर बंदी आहे असे पदार्थ विकले जात नाहीत ना हे पाहणं त्यांचं काम आहे. तसं होत असेल तर ते तातडीने बंद करायला लावले पाहिजेत. पालक समिती असते, शिक्षकांची समिती असते. ते परस्परांना नावं ठेवतात. पालक समिती म्हणते की मुख्याध्यापक कारवाई करत नाहीत.

एफडीए काहीच करत नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की एफडीएला तुम्ही सांगितलंत तर आम्ही कारवाई करुच. त्याबद्दल काही दुमत नाही. पण प्रत्येक शाळेत, प्रत्येक भागांमध्ये जाणं आम्हालाही शक्य नाही. पण प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक आहेत, पालक जात असतात.

ते तिथल्या तिथे हे रोखू शकतात. त्यामुळे ही चळवळ उभी राहणं गरजेचं आहे. मला जर आयुक्त म्हणून काही मिळवायचं आहे तर ते हेच आहे की नागरिकांनी सजग राहून भेसळीच्या विरोधात एक चळवळ उभी केली पाहिजे. चांगले पदार्थ खाण्याची सवय लागली पाहिजे असं मत तुकाराम मुंढे यांनी मांडलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात ही मानसिकता बदलली गेली पाहिजे-तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंना पुढे हे विचारण्यात आलं की सगळे नियम असताना शाळांच्या परिघात प्रतिबंध असलेले पदार्थ विकले जातात. पोलिस कारवाई करु शकतात, मुख्याध्यापक ते बंद करु शकतात तरीही याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अगदीच सामान्य किंवा दुर्लक्षित असा का आहे? असं विचारलं गेलं तेव्हा तुकाराम मुंढे म्हणाले, ही माझी जबाबदारी नाही, असं प्रत्येकाला वाटतं.

शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात हे प्रत्येकाला वाटतं. मी नाही करणार दुसरा करेल. काही गोष्टी रोखायच्या असतील पालकांना वाटतं शाळेने रोखावं. शाळेला वाटतं पालकांनी लक्ष घातलं पाहिजे आणि मुलांना असे पदार्थ घ्यायला प्रोत्साहन देऊ नये. दोघांनाही काय वाटतं की एफडीएने कारवाई करावी आम्ही काय करणार? टपरीवाला म्हणतो विकत घेणारे लोक आहेत म्हणून विकतो, मला पैसे कमावायचे आहेत.

प्रत्येकजण दुसऱ्याकडे बघतो आहे, दुसरं कुणीतरी येऊन जबाबदारी घेईल. पण त्याचा परिणाम आपल्या समाजावर होतो आहे. समाजाचीही नागरिक म्हणून जबाबदारी आहे. कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या स्वतःसाठी करायचं आहे. मी अधिकारी आहे तर मी हा विचार नाही करणार की मी आयुक्त आहे म्हणून मी माणूस पाठवतो, जी माझी जबाबदारी आहे ती मला पाळलीच पाहिजे.

माणूस म्हणून कुटुंबाप्रती जशी जबाबदारी आहे, मुलांनी काय खावं ही तुमची जबाबदारी आहे. हे प्रत्येकाने केलं तर भेसळयुक्त पदार्थ विक्री बंद होऊ शकते. पण हे महाराष्ट्रातल्या १३ कोटी लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही कारवाई करायची आहे ती करुच.

समाजाकडे कुटुंब म्हणून बघा, सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या कुटुंबाकडे जसं आपण जबाबदारीने पाहतो तसं समाजाकडे कुटुंब म्हणून पाहावं असं मला वाटतं अशी अपेक्षा तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तुकाराम मुंढे

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जमिनींची होणार चौकशी; महसूलमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

July 10, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

धक्कादायक! विजेचा धक्का लागून अख्ख कुटुंब संपलं, चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

July 8, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
Next Post
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा