मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपयाचा हप्ता जमा होत आहे.
नुकताच अनेक महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते, त्यामुळे त्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाहीयेत. त्यामुळे त्या निराश आहेत किंवा पैशाची वाट पाहतायत.
अशात आता ज्या महिलांना पैसे आले नाहीयेत त्या महिलांनी ही चूक करू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर मे महिन्यात अनेक महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीयेत. त्यामुळे अशा महिलांमध्ये केवायसी न झाल्याची भिती आहे.
कारण ज्या महिलांची केवायसी पूर्ण होणार, त्यांनाच सरकारकडून पैसे मिळतील, असे सतत बोलले जाते. पण सरकार असं जरी बोलत असली तरी केवायसीसाठी मुदतवाढ देत आहे. त्यामुळे कोणत्याही महिलांचे पैसे केवायसी पायी अडत नाही आहेत.
पण आता ज्या महिलांचा केवायसी झालीच नाही आहे. त्या महिलांना ई केवायसीसाठी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या पोस्ट खोट्या असल्याचे महाराष्ट्र डिजीआयपीआरने सांगितलं आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत.
याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही, असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.त्यामुळे सदर पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










