टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी एकादशी सोहळ्याच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या एकाच तालुक्याच कोरोनाचे ३३ सक्रिय रुग्ण आहेत.
पंढरपूर शहरातील एका ७६ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा सोलापूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपुरातील रुग्णवाढ आरोग्य विभागाला चिंतेत टाकणारी आहे.
पंढरपूर शहरातील एक ७६ वर्षीय व्यक्ती दि.२१ जूनला अश्विनी रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. त्यांना मधुमेहाचा त्रासही होता.
उपचार सुरू असताना रात्री ११.४० वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी सांगितले .
ग्रामीण भागात शुक्रवारी एकूण १४० कोरोना चाचण्या झाल्या. यातून १८ रुग्ण आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या चार जणांना डिस्चार्ज मिळाला.(स्रोत:लोकमत)
सध्या ग्रामीणमध्ये ७५ सक्रिय रुग्ण आहेत.
यात मंगळवेढा ६, अक्कलकोट तालुक्यातील १ , बार्शी ८ , माढा ९, माळशिरस ११ , मोहोळ २ , उत्तर सोलापूर १ , पंढरपूर ३३ , सांगोला २ , दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या शनिवारअखेर १ लाख ८६ हजार १८९ झाली. यापैकी १ लाख ८२ हजार ३८७ जण बरे झाले आहेत.
मृतांची एकूण संख्या ३७२७ झाली. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ८२६ झाली. यापैकी ३२ हजार २१३ जण बरे झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज