टीम मंगळवेढा टाईम्स ।
तू जेवणात दूध का वाढले नाही याचा राग मनात धरून चिडून ३२ वर्षीय पत्नीच्या पोटात चाकुने मारून गंभीर जखमी केले
तसेच पोलिसात तक्रार केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवरा राहुल विलास मस्के (रा.शरद नगर ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी अलका राहुल मस्के (वय ३२ राहणार शरद नगर) या रात्री ९.३० वाजता घरातील सर्वजण जेवण करीत असताना
आरोपी पती राहुल याने तू मला जेवणात दूध का वाढले नाही असे म्हणून शिवीगाळ करू लागला यावर फिर्यादीने जेवताना भांडणे काढू नका शांत जेवण करा ? असे म्हणत असताना
आरोपीने जवळच पडलेला चाकू घेऊन फिर्यादी पत्नीच्या ओटी पोटात डावे बाजूस चाकूने मारून गंभीर जखमी केले
यावेळी फिर्यादीस चक्कर येऊ लागल्याने मुलगा सार्थक हा घरातून बाहेर घेऊन जात असताना मुलास तू मध्ये येऊ नको अन्यथा तुलाही मारीन अशी दमदाटी केल्याची दिलेल्या म्हटले आहे.
जखमी पत्नीने खाजगी दवाखन्यात उपचार करून माहेरी कळवुन नवऱ्याच्या भितीपोटी आईवडीलांना घेऊन तक्रार देण्यास आल्याचे तक्रारीत म्हटले असून याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज