टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घटकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शिंदेंनी नियमितपणे कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं म्हटलंय.
तसेच शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची घोषणाही यावेळेस केली. तसेच पोलिसांच्या निवासासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा नियोजित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान
3 वर्षांची मुदत 2 वर्षांवर आणली
जवळपास 50 हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार
शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची घोषणा
प्रति युनिट मागे 1 रुपयांची सवलत
२.१६ पैशे ऐवजी 1.16 पैशे
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट मदत
पैठणच्या सिंचन योजनेला मान्यता
भातसा धरणासाठी 1550 कोटींची मान्यता
15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्याचा निर्णय
लोणार सरोवर विकास आरखड्याला मंजूरी, 370 कोटींची मंजूरी
हळद संशोधन केंद्राला मान्यता, 100 कोटी रुपयांचं निधी
संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील 40 गावांना फायदा
पोलिसांच्या घरासाठी मास्टर प्लॅन तयार करणार
कोरोना काळातील गुन्हे तपास करुन मागे घेणार
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज