मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । पंढरपूर । राजेंद्र फुगारे
पंढरपूर वेणूनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात येत असलेल्या बायो- सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवार, ७ मे २०२३ सकाळी ९ वाजता
माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
आर्थिक अडचणीत आलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गत हंगामापासून पुन्हा रूळावर येत आहे.
शेतकऱ्यांची थकीत देणी देऊन गत हंगाम पाटील यांनी सक्षमपणे चालवून दाखविला. त्यानंतर आगामी हंगामाची तयारीही जोमाने सुरू केली आहे.
याप्रसंगी आ.रोहित पवार, खा. ओमराजे निंबाळकर, आ. बबनदादा शिंदे, आ. रविंद्र धंगेकर, आ. कैलास पाटील, आ. यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, दिलीप सोपल, राजन पाटील,
दत्तात्रय सावंत, धनाजी साठे, बळीराम साठे, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह प्रविण गायकवाड, प्रा. शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, संभाजी शिंदे, अजित जगताप, लतिफ तांबोळी आदी उपस्थित राहणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज