टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर आणि माढा लोकसभेची निवडणूक तिसऱ्या टप्यात होणार असून, त्यासाठी अर्ज दाखल करण्यास आज शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून सात रस्ता येथील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज स्विकृती होणार आहे.
त्या ठिकाणी माढा आणि सोलापूर दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणूक कार्यालयाची तयारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी निवडणूक कार्यालयात सीसीटीव्हीसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सोलापूर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः अर्ज स्विकारणार आहेत. तर माढा लोकसभेसाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर या निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे.
उमेदवारांची गैरसोय होवू नये यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. अर्ज विक्री, तपासणी, अनामत रक्कम भरणे, तसेच मतदार यादीत नाव तपासून भरलेला अर्ज दाखल करण्यासाठी एकाच रांगेत तयारी करण्यात आलेली आहे.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर चोख पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. गेटवरच पोलिसांचा पहारा असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता कामाशिवाय सात रस्ता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही अशी परिस्थितीत दिसून येत आहे.
उमेदवाराबरोबर चार तर अपक्षाबरोबर दहा लोकांनाच प्रवेश
विविध पक्षाच्या उमेदवारासोबत अर्ज भरण्यासाठी चार लोकांनाच सोडण्यात येणार आहे. तर अपक्ष उमेदवाराबरोबर किमान दहा लोकांना अर्ज भरण्यासाठी आतमध्ये सोडले जाणार आहे. त्यामुळे इतर लोकांनी विनाकारण जिल्हाधिकारी तथा निवडणूक कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज