टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असतानाच
आता मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लागत नसल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला असल्याचे समोर येत आहे.
जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
भागडे यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपला राजीनामा देतांना म्हटले आहे की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाज उपोषण करीत आहे.
तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मी सुद्धा मराठा समाजाचा आहे, माझे सुद्धा समाजाप्रती काही तरी देणे लागते म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनाम देत आहे.
शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. माननीय पोलीस अधिक्षक साहेब यांनी माझा राजीनामा मंजुर करावा हि नम्र विनंती, असे भागडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहले आहे.
कोण आहेत शिवाजी भागडे?
मराठा आरक्षणासाठी पोलीस दलाच्या नोकरीचा राजीनामा देणारे शिवाजी भागडे हे जालना पोलीस दलात कार्यरत आहे.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज