टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे शेतात काम करीत असताना एका ४५ वर्षीय शेतकऱ्याच्या पायास साप चावल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची नोंद मंगळवेढा पोलीसात झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत नामदेव सिद्राम पुजारी हे दि.२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता तामदर्डी येथील त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांच्या डाव्या पायाला साप चावला होता.

या दरम्यान कुटूंबियाने तात्काळ त्यांना मंगळवेढ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचार सुरु असताना ते मयत झाले असल्याचे औदुसिध्द पुजारी यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.

दरम्यान बी.एन. एस.एस कलम १९४ प्रमाणे पोलीसात याची नोंद झाली आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार वंदना घोडके या करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













