टीम मंगळवेढा टाइम्स (प्रतिनिधी) :
‘तू माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ असा जाब विचारत सासऱ्यासह सासू आणि पत्नीने मिळून एका २२ वर्षीय जावयावर दगडाने जीवघेणा हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यात घडली आहे.

या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आई-वडिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी सासरे बलभीम संभाजी शिवशरण, सासू वंदना बलभीम शिवशरण आणि पत्नी सोनाली रविकुमार माने या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलबाहेरच भरदिवसा राडा
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविकुमार महादेव माने (वय २२, रा. कोंडूभैरी गल्ली, मंगळवेढा) हे पंढरपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास रविकुमार हे हॉटेलच्या गेटबाहेर पाण्याचा टँकर खाली करण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक सासरे बलभीम शिवशरण, सासू वंदना आणि पत्नी सोनाली तिथे आले.

दगडाने मारहाण, आई-वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी तुडवले
पत्नी सोनाली हिने “मला तू कधी नांदायला घेऊन जाणार?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला जाताच आरोपींनी तेथेच पडलेला मोठा दगड उचलून रविकुमार यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर आणि डाव्या पायाच्या नडगीवर जोरदार मारून त्यांना रक्तबंबाळ व गंभीर जखमी केले.

यावेळी आरडाओरड ऐकून रविकुमार यांचे वडील महादेव आणि आई रंजना हे मुलाला वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही अर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पंढरपूर रोड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. जखमी रविकुमार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













