टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुळजापूर येथून नवरात्रोत्सवासाठी ज्योत आणण्याच्या नावाखाली दुचाकींच्या सायलेन्सरमधील पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाज करत दहशत आणि हुल्लडबाजी माजवणाऱ्या तरुणांवर मंगळवेढा पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. अशा उपद्रवी ९ दुचाकीस्वारांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांची वाहने थेट जप्त केली आहेत.
दरम्यान, रविवारपासून ही धडक मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी दिला आहे.

तालुक्यात सध्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याने यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत आणि साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मात्र, तुळजापूरहून ज्योत आणण्याच्या धार्मिक परंपरेचा गैरफायदा घेत काही तरुण रस्त्यांवर सुसाट आणि बेशिस्तपणे वाहने चालवत शांतता भंग करत असल्याचे समोर आले होते.

या उपद्रवाची गंभीर दखल घेत मंगळवेढा पोलिसांनी ग्रामीण भागासह प्रमुख मार्गांवर गस्त वाढवली. कर्णकर्कश आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्या नऊ दुचाकींवर तत्काळ कारवाई करून त्या ताब्यात घेण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सूरज साळुंखे आणि प्रवीण जाधव यांच्या पथकाने केली.
उत्सवाच्या नावाखाली नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












